ठाकरे आणि शिंदे गटात “त्या” गोष्टीवरुन वादाची ठिणगी 

ठाकरे आणि शिंदे गटात “त्या” गोष्टीवरुन वादाची ठिणगी 

गट वेगळे पण जुनी मैत्री जपली

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या मदतीला शिंदे गटाचे आमदार आणि नगरसेवक धावले !

दिनेश जाधव : कल्याण

कल्याण – ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाला पोलिसांकडून तडीपारची नोटीस मिळाल्यानंतर शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर हे त्यांच्या मदतीसाठी धावून आल्याचे दिसून आले या घटनेमुळे ठाकरे – शिंदे गटातील जुनी दोस्ती उफाळून आल्याचे दिसून येत आहे.

ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी यांना पोलिसांकडून तडीपारची कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसी नंतर शिंदे गटात गेलेले कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार विश्वनाथ भोईर हे त्यांच्या मदतीसाठी धावून गेले आहेत.

आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेत साळवी यांच्या विरोधात कोणतीही अन्यायकारक कारवाई होऊ नये अशी मागणी केली आहे. राज्यात सुरु असलेल्या राजकारण हे प्रथमच होत आहे की, ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यासाठी शिंदे गटातील आमदाराने मदतीचा हात पुढे केला आहे.

राज्यात सत्ता संघर्षाची लढाई एकीकडे कोर्टात सुरु असताना दुसरीकडे कल्याणमध्ये एक वेगळे राजकारण पाहावयास मिळाले आहे. काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे कल्याण महानगर प्रमुख आणि कल्याण मुरबाड शिवसेना जिल्हा प्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून तडीपारची नोटिस पाठविण्यात आली. साळवी यांना पोलिसांकडून त्यांचे प्रतिउत्तरासाठी वेळ देण्यात आली. यावेळी साळवी यांनी ही कारवाई सूडबूद्धीने होत असल्याचा आरोप केला होता. साळवी यांनी शेकडो समर्थकांसह एसीपी कार्यालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदविला आहे. पोलिसांत हे प्रकरण सुरु असताना थेट शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर शिंदे गटातील नगरसेवकांसोबत डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेतली.

यावेळी आमदार विश्वनाथ भोईर माजी नगरसेवक मोहन उगले माजी. नगरसेवक रवी पाटील सुनील वायले, जयवंत भोईर प्रभुनाथ भोईर,श्रेयस समेल उपस्थित होते. या वेळी विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की, विजय साळवी आणि आमचे पारिवाराचे संबंध आहे. आम्ही दोघे एकत्रित काम केले आहे. ही कारवाई सूडबुद्धी केली गेली नाही. त्यांच्या विरोधात राजकीय गुन्हे दाखल आहेत. ही रूटीन प्रोसेस आहे. मात्र विजय साळवी यांच्या वर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी पोलिसांनी याची दक्षता घ्यावी. विश्वनाथ भोईर यांच्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: