बालगृहात सूटुन, तयार केली टोळी डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

बालगृहात सूटुन, तयार केली टोळी
डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

दिनेश जाधव : डोंबिवली

सायकल आणि मोबाईल चोरी केल्याने काही अल्पवयीन मुलांना रामनगर पोलीस ठाण्याने अटक करून बाल सुधारगृहात पाठवले होते. मात्र त्यानंतर नायायलायाच्या आदेशानुसार त्यांची सुटका होताच त्यातील दोघांनी गेल्या आठवड्याभरातच सायकल आणि मोबाईल चोरी करण्यासाठी एक वेगळी टोळी तयार केली. रात्रीच्या वेळेत नागरीकांना लुटण्याचे काम करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करण्यात आला. मात्र अल्पवयीन मुलांकडून अशा प्रकारचे कृत्य झाल्याने डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे.
या अल्पवयीन मुलांचे साथीदार सागर शर्मा, जेम्स सुसे, सत्यकुमार कनोजिया, सचिन राजभर आणि सोनू कनोजियाला राम नगर पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या नेतृत्वात कल्याण डोंबिवली पोलिसांनी चोर आणि लूट करणाऱ्यांच्या विरोधात कंबर कसली आहे. गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्पेशल टीम तयार करण्यात आली आहे. या टीमची कामगिरी वेळोवेळी समोर येत आहे.

नुकताच, डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांना माहिती मिळाली होती की, काही चोरटे ठाकूर्ली येथील म्हसोबा चौकात येणार आहेत. डोंबिवलीचे एसीपी सुनिल कुऱ्हाडे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदशानाखाली पोलिस अधिकारी योगेश सानप यांच्या पथकाने सापळा रचला आणि सात लोकांना ताब्यात घेतले. या सातपैकी दोन जण अल्पवयीन होते. मात्र या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्यावर पोलिसांसमोर धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोन लहान मुलांकडून मोठय़ा प्रमाणात लहान मुलांच्या चोरीस गेलेल्या सायकल आणि 22 मोबाईल हस्तगत करण्यात आले. या दोन अल्पवयीन मुलांनी लूटपाट करण्यासाठी या पाच जणांना एकत्रित करुन मोठी गँग तयार केल्याचे उघड झाले आहे. या गँगचा लोकांवर कारवाई केल्याने पोलिसांचे कौतूक होत आहे. पथक प्रमुख योगेश सानप, बळवंत भराडे, विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, सूनिल भणगे यांच्या पथकाने या गँगला पकडल्याने त्यांचे कौतूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: