दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या आरोपीस कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या

दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या आरोपीस कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या

दिनेश जाधव : कल्याण

दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या आरोपीस कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून जवळपास 70 हजार रुपयाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपी मुंब्रा येथील कौसा परिसरात राहत असून अब्ररार शेख 24 असे आरोपीचे नाव आहे. डोंबिवलीत घडलेल्या एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विविध पथके गुन्हे शाखेकडून तयार करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सीसीटिव्ही द्वारे सुरू असतानाच पोलीस शिपाई विनोद चन्ने यांना गुप्तहेर यांच्याकडून संशयित आरोपी मुंब्रा शहरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या पथकाने मुंब्रा येथील भोलेनाथ नगर जवळ सापळा रचला. यावेळी त्यांना अब्रारार संशयित रित्या फिरताना दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून 70 हजारांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या आरोपीवर नागपाडा ओलीस ठाणे, मुंब्रा पोलीस ठाणे, पेण पोलीस ठाणे, अलिबाग पोलीस ठाणे, कळवा पोलीस ठाणे, डायघर पोलीस ठाणे, आगरी पाडा पोलीस ठाणे, विष्णू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय माळी, पोलीस शिपाई विनोद चन्ने, पोलीस राहुल ईशी यांनी ही कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: