
कल्याणमध्ये 25 लाखाचा गुटख्यासह तिघांना डीसीपी स्कॉडने ठोकल्या बेडय़ा
दिनेश जाधव : कल्याण
गुटख्याने भरलेला कंटेनर कर्नाटकातून वाहतूक करून उल्हासनगर येथे पोहचणार असल्याची खबर पोलिसांना मिळताच डीसिपी स्कॉडने 25 लाख रुपये किमतीचा गुटखा तस्करी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. कर्नाटकहून उल्हासनगरला जाणारा हा गुटखा नक्की कोणाचा आहे याचा शोध आत्ता पोलिस घेत आहेत.
कल्याण डोंबिवलीत उल्हासनगर आणि अंबरनाथ बदलापूरसह इतर भागात उघडपणे विकला जातो. कल्याण डोंबिवलीतील पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकून गुटखा जप्त करीत त्याची विक्री करणाऱ्या अनेकांच्या विरोधात कारवाई केली आहे. मात्र तरी देखील हा गोरखधंदा सुरुच असल्याचे काही प्रमाणात दिसून येते. शनिवारी रात्री कल्याण डीसीपी स्कॉडचे पोलिस कर्मचारी संजय पाटील अणि ऋषिकेश भालेराव यांना गांधारी रोडवर गुटख्याचा कंटेनर येणार असल्याची माहिती मिळाली. डीसीपी स्कॉड आणि खडकपाडा पोलिसांनी गांधारी रोडवर सापळा रचला आणि भिवंडी पडघा मार्गे कल्याणमध्ये येत असलेला गुटख्याचा एक कंटनेर पोलिसांनी अडविला. त्या कंटेनरमध्ये फो के स्टार हा गुटखा असल्याचे मिळून आले. या गुटख्याची बाजारातील किंमत 25 लाख रुपये आहेत. पोलिसांनी या गुटख्याची तस्करी करणा:या कंटनेर चालक मशाक इनामदार याला अटक केली आहे. तो कर्नाटक येथील राहणारा आहे. त्याच्यासोबत उल्हासनगरात राहणारा लव सहानी, प्रेमचंद वाठोरे याला देखील अटक केली आहे. या प्रकरणात रजनीकांत गायकवाड याचा पोलिस शोध घेत आहेत. हा गुटखा कर्नाटकहून उल्हासनगरला आणण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती आहे. नक्की हा गुटखा कोण खरेदी करणार होता. त्याची तस्करी कोण करतोय याचा शोध आत्ता पोलिस घेत आहे.