पालिकेचे सार्वजनिक शौचालय कोसळले

पालिकेचे सार्वजनिक शौचालय कोसळले

सकाळीच गर्भवती महिला झाली होती जखमी 

पालिकेच्या सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न ऐरणीवर

दिनेश जाधव : कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या डागडुजीकडे सततचे दुर्लक्ष केल्याने मोहने येथील लहुजी नगर या गरिब बहुल वसाहतीत शौचालयाच्या भांड्यासह कमकुवत भाग सेफ्टी टॅंक मध्ये कोसळल्याची दुर्घटना बुधवारी सकाळी घडली होती. या दुर्घटनेनंतर पालिका अधिकाऱ्यांनी फक्त पाहणी केली. अखेर बुधवारी रात्री पूर्ण शौचालय कोसळल्याने आजूबाजूच्या घराचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरातील महिलांनी अनेक वेळा तक्रार करून पालिका अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे सांगत नवीन शौचालय मिळाले नाही तर उद्या रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे नमूद केले आहे.

काल सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रांत विधीसाठी केलेली गर्भवती महिला या दुर्घटनेत जखमी झाली आहे. मोहने येथील लहुजी नगर येथे सुमारे २७ वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने चार पुरुषांकरिता तर चार महिला वर्गांसाठी सार्वजनिक शौचालय बांधले होते मात्र या शौचालयांच्या देखभाल दुरुस्ती करता वारंवार निधी उपलब्ध करूनही ठेकेदार वरच्यावर मलमपट्टी करून पालिकेकडून दुरुस्तीचे बिल उकळण्यात धन्यता मानत आहे. या शौचालयांची अवस्था अत्यंत दैन्य झाली असून कडी कोयंडे ते दरवाजे नसल्याचे दिसून येत आहे

आज सकाळच्या सुमारास उमा रिठे वय २२ ही गर्भवती महिला साडेसहाच्या सुमारास प्रांत विधीसाठी गेले असता अत्यंत कमकुवत झालेले शौचालयाच्या भांड्यासह भाग कोसळून सदरहू महिला सेफ्टी टॅंक मध्ये पडली गर्भवती असलेली महिलेने कसेबसे स्वतःला सावरत सेफ्टी टॅंक मधून बाहेर पडण्याचा आटोक्यात प्रयत्न करू लागली मात्र ती गाळात रुतल्याने तिला बाहेर पडणे मुश्किल होऊन बसले याच दरम्यान तिने आपला जीव वाचवण्याकरता मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात करू लागली शौचालयाच्या नजीक राहत असणाऱ्या एका नागरिकाने तिचा आवाज ऐकल्याने घटनास्थळी जात सेफ्टी टॅंक मध्ये अडकलेल्या गर्भवती महिलेला मोठ्या शिताफीने बाहेर काढण्यास यश संपादन करीत गर्भवती महिलेस जीवदान दिले.

मात्र या दुर्घटनेत गर्भवती महिलेस इजा झाली असून तिला एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे तिची प्रकृती स्थिर असल्याचे यावेळी सांगण्यात आले या संदर्भात कल्याण डोंबिवली मनपाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांना संपर्क साधला असता आपण कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवत असल्याचे यावेळी सांगितले. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी केवळ पाहणी करून ते निघून गेले. मात्र बुधवारी रात्री हे शौचालय कोसळले असून आजूबाजूच्या घराचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. येथील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्र घतला असून देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष लोटली तरी मूलभूत सोयीसाठी येथील नागरिकांना झगडावे लागत असल्याने दुःख व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: