
महापालिका आणि सीएची फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा
– या दोघांनी बनावट कागदपत्रे तयार करून कंत्राट मिळवले
दिनेश जाधव : कल्याण
महपालिकेचे जंतुनाशक फवारणीचे कंत्राट मिळवण्यासाठी चारटर अकाऊंट आणि फर्मची खोटे ओव्हर सर्टफिकिट बनवून त्यावर खोटी सही व शिक्का घेणाऱ्या दोन जणांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र सानप आणि रोहिदास भेरले अशा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा विभागाचा ऑनलाईन निविदा नुकत्याच निघाल्या होत्या. त्या निविदा भरण्यासाठी महेंद्र आणि रोहिदास यांनी संगनमत करून चार्टर अकाउंटंट मेहराज शेख यांच्या फर्मचे बनावट टर्न ओव्हरचे सर्टफिकीट बनवून त्यावर मेह राज यांची खोटी सही सही व बनावट शिक्का वापरून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या जंतू नाशक फवारणीचा कंत्राट मिळण्याकरता वापर केला. ही बाब सी ए मेहराज यांच्या लक्षात येताच त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन महेंद्र आणि रोहिदास यांच्या विरोधात 420, 465 , 467, 471 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.