गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना अटक

गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना अटक

दिनेश जाधव : डोंबिवली 

डोंबिवली- मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रीसाठी दोन जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मानपाडा पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे फैजल फारुख ठाकूर आणि मोहम्मद आतीफ हाजीजउल्ला अन्सारी अशी आहे. अन्सारी हा भिवंडी येथे राहणारा आहे. तर फैजल हा मुंबईतील माजगावचा रहिवासी आहे. या दोघांकडे 47 हजार रुपये किंमतीचा 272 किलो गांजा मिळून आला आहे. उंबार्ली गावातील मोकळ्य़ा मैदानात इन्व्हो कार संशयास्पदरित्या आढळून आली. त्याठिकाणी जाऊन पोलिसानी चौकशी केली असता त्या गाडीत गांजा मिळून आला.

सदर आरोपी यांनी गांजा कोठुन व कसा आणला याबाबत तपास चालु आहे. नमुद आरोपीत हे सध्या पोलीस कोठडीत असुन, त्याचेकडे अधिक चौकशी चालु आहे. गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक (प्रशा) सुरेश मदने हे करीत आहेत. सदरची कारवाई दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३, कल्याण, सुनिल कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाणेचे वपोनिरी. शेखर बागडे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: