डोंबिवली एमआयडीसीत सुरक्षा रक्षकाची हत्या

डोंबिवली एमआयडीसीत सुरक्षा रक्षकाची हत्या

दीड लाखांचे सामान लांपास

दिनेश जाधव : डोंबिवली

डोंबिवली एमआयडीसीच्या फेज १ मधील खंबाळपाडा रस्त्यावर असलेल्या एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची मंगळवारी रात्री धारदार शस्त्राने अज्ञात चोरट्यांनी हत्या केली आहे. चोरीच्या उद्देशाने ही हत्या केली असण्याचा संशय मानपाडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. मारेकऱ्यांनी कंपनीतून दीड लाखाचे सामान चोरून नेले आहे.
ग्यानबहादुर भिमबहादुर गुरूम (६४) मृत सुरक्षा रक्षकाचे नाव असून तो खंबाळपाडा रोडला विजय पेपर प्रॉडक्ट कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता. या संदर्भात जसवंतसिंग रणबहादुर ठाकूर (५०) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खंबाळपाडा रस्त्याला विजय प्राॅडक्ट पेपर कंपनीत ग्यानबहादुर गुरूम हे नोकरीला होते. कंपनीतून कासा धातुचे गठ्ठे, ताबा धातुची वर्तुळे, पितळ, तांब्याचे तुकडे असा दीड लाख रुपये किमतीचा धातुचा साठा चोरट्यांनी चोरून नेला आहे.
ग्यानबहादुर हे मंगळवारी रात्री विजय पेपर कंपनीत तैनात असताना अज्ञात चोरट्यांनी कंपनीत चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला. त्यांना सुरक्षा रक्षक ग्यानबहादुर यांनी कडवा प्रतिकार केला असावा, या वादातून चोरट्यांनी ग्यानबहादुर यांच्यावर धारदार, टणक हत्याराने सर्वांगावार फटके मारून त्यांना गंभीर दुखापती केल्या. यात ते जागीच ठार झालाले. त्यांना मारल्यानंतर चोरट्यांनी ग्यानबहादुर यांचा मोबाईल, इतर धातुच्या वस्तू चोरून नेल्या. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर ग्यानबहादुर यांचा मृतदेह विच्छेदनासाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: