व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत करत होते मुलीवर अत्याचार, अखेर मुलीने केली आत्महत्या

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत करत होते मुलीवर अत्याचार, अखेर मुलीने केली आत्महत्या

कोळसेवाडी पोलिस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल

दिनेश जाधव : कल्याण

कल्याण पूर्वेत घडलेल्या एका घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एका तरूणीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका मुलीच्या मदतीने सात तरुण पीडीतेवर गेल्या दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार करत होते. या त्रासाला कंटाळून दोन दिवसापूर्वी या तरुणीने अखेर आत्महत्येचा मार्ग पत्करला. इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत तिने आत्महत्या केली. याप्रकरणी तरुणीच्या मोबाईलचा तपास केला असता तिच्या मोबाइलमध्ये सापडलेल्या सुसाईड नोट द्वारे कोळशेवाडी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यामध्ये एका तरुणीचा देखील समावेश आहे.

कल्याण पूर्व परिसरात एका तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासादरम्यान मयत तरुणीच्या मोबाईल मध्ये पोलिसांना सुसाईड नोट आढळली. या सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. सुसाईड नोट मधील मजकुरामुळे पोलिस ही थक्क झाले. सदर मयत तरुणीला याच परिसरात राहणारे सात तरुण व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर गेल्या दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार करत होते. धक्कादायक बाब म्हणजे या सात विकृत नराधमामध्ये एक तरुणी हे गैरकृत्य करण्यासाठी मदत करत होती. ही तरुणी पिडीतेची मैत्रीण होती .पोलिसांनी या प्रकरणात आठ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे .दरम्यान अटक आरोपी मधील काही तरुण कल्याण मधील धनदांडग्या बिल्डरची मुलं असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: