
सीसीटीवीच्या सह्याने घरफोडी करणा:या तीन महिला अटकेत
पुण्यातील पुरंदर येथून केली अटक
दिनेश जाधव : कल्याण
डोंबिवली-निळकंठ सोसायटीत राहणार्या चैताली शेट्टी या सकाळी कामावर निघून गेल्या असत्या त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील 2 लाख 81 हजार रुपयांचे दागिने व रोकड चोरी करुन चोरटे पसार झाले होते. पोलिसांनी सीसीटीवीच्या सहाय्याने तपास केला असता चोरी करणा:या तीन चोरटय़ा महिलांना पुण्यातील पुरंदर येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी करण्यात आालेला ऐवजही हस्तगत केला आहे.
ही घटना 2 जून रोजी घडली होती. शेट्टी या दाराला कुलुप लावून कामावर गेल्या सकाळी साडे आठ वाजता त्यांनी घर सोडले. घर सोडता. त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरटे त्यांच्या घरात शिरले. घरातील दागिने व रोकड असा एकूण 2 लाख 81 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चैताली यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना चोरटय़ांचे नंबरही मिळाले. त्यांचे लोकेशन जेजूरी नजीक पुरंदर येथे आढळून आले. पोलिसानी चोरटय़ांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या चोर या महिला आहे. त्यांची नावे सारीका शंकर सकट, सुजाता शंकर सकट आणि मीना उमेश इंगळे अशी आहे. या तिघींच्या विरोधात यापूर्वी ठाण्यात गुन्हा दाखल आहे अशी माहिती पोलिस अधिकारी किशोर शिरसाठ यानी दिली.