
उच्च शिक्षित मुलाने जन्मदात्या आईवडिलांना गळा चिरून संपवले
दिनेश जाधव : कल्याण
आई- वडील म्हणजे प्रत्येक मुलांसाठी खर तर देवाचा अंश असतात, त्याच्या मुळे जीवनात जगात आणण्याचे काम करतात त्यांची सेवा करण्याचे पुण्य हे सर्वात मोठे असते. मात्र सर्वांच्याच नशिबात हे काहींच्या नशिबी भाग्य नसते आणि काहींच्या असते मात्र त्यांना त्याची किंमत नसते. ज्या चिमुकल्या हातांना धरून त्यांच्या हातात बळकटी येण्यासाठी सामर्थ्य येण्यासाठी आई -वडील आपल्या जीवाचे रान करतात तेच चिमुकले हात जर आई – बापाच्या गळ्यावर सुरा फिरवण्यासाठी धजावत असतील तर यापेक्षा भयानक आणि दुर्भाग्यशाली काय असू शकते. अशीच माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे मांडा टिटवाळा परिसरात.
मांडा-टिटवाळा येथील राहत्या घरात पती-पत्नीची हत्या झाल्याचा प्रकार गुरुवारी संध्याकाळी उघडकीला आला. या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी
त्यांच्या मुलाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
मांडा येथील पंचवटी चौक नजीक असणाऱ्या साई दर्शन इमारतीत राहणारे अशोक भोसले (६९), पत्नी विजया भोसले (६१) आणि त्यांचा मुलगा असे कुटुंब राहते. अशोक आणि विजया यांच्या घरातून गुरुवारी संध्याकाळी दुर्गंधी येऊ लागली. ही माहिती टिटवाळा पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी राजू वंजारी
घटनास्थळी आले. त्यांना घरात पती, पत्नीची हत्या केल्याचे आढळले. हा प्रकार बुधवारी संध्याकाळी झाला असण्याचा संशय पोलिसांना आहे.
दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत, असे टिटवाळा मधील कल्याण तालुका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले.
ही हत्या कोणी आणि कशासाठी केली याचे कोणतेही धागेदोरे सध्या उपलब्ध नाहीत. या प्रकरणात मयत अशोक यांच्या मुलाला यांस संशयित म्हणून प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. १६ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.