टिटवाळ्यात आई वडीलाच्या हत्या प्रकरणी संशयित मुलाला अटक

टिटवाळ्यात आई वडीलाच्या हत्या प्रकरणी संशयित मुलाला अटक

दिनेश जाधव : कल्याण

टिटवाळा– मांडा-टिटवाळा येथील राहत्या घरात पती-पत्नीची हत्या झाल्याचा प्रकार गुरुवारी संध्याकाळी उघडकीला आला. या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या मुलाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
मांडा येथील पंचवटी चौक नजीक असणाऱ्या साई दर्पण इमारतीत राहणारे अशोक भोसले (५५), पत्नी विजया भोसले (५०) आणि त्यांचा मुलगा असे कुटुंब राहते. अशोक आणि विजया यांच्या घरातून गुरुवारी संध्याकाळी दुर्गंधी येऊ लागली. ही माहिती टिटवाळा पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आले. त्यांना घरात पती, पत्नीची हत्या केल्याचे आढळले. हा प्रकार बुधवारी संध्याकाळी झाला असण्याचा संशय पोलिसांना आहे.
दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत, असे टिटवाळा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले.
ही हत्या कोणी आणि कशासाठी केली याचे कोणतेही धागेदोरे सध्या उपलब्ध नाहीत. या प्रकरणात मयत अशोक यांच्या मुलला यांस संशयित म्हणून प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: