उत्पादन शुल्क खात्याच्या डोंबिवली विभागाची कारवाई

उत्पादन शुल्क खात्याच्या डोंबिवली विभागाची कारवाई

मुब्रा पोलीस ठाण्यासमोर पकडली हातभट्टीची दार

दिनेश जाधव : डोंबिवली

डोंबिवली उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना एक इसम मुंब्रा कौसा पोलीस ठाणे हद्दीतून हातभट्टीच्या (गावठी) दारूचे फुगे वाहनातून घेऊन जाणार आहे, अशी गुप्त माहिती मिळाली होती. उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली करून मुंब्रा कौसा भागात सापळा लावून एका वाहनातून ६४० लीटरची १ लाख ७८ हजार रूपये किमतीची गावठी दारू जप्त केली.
फुग्यांमधून भरून ही दारू विक्रीसाठी नेण्यात येत होती. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या बाजुला हा सगळा प्रकार घडल्याने परिसरातील रहिवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलिसांची सतत वर्दळ असते. अशा परिस्थितीत मुंब्रा कौसा पोलीस ठाण्याजवळ वाहन आणण्याचे धाडस दारू विक्रेत्याने केले कसे ? त्याला कुणाचे पाठबळ होते ? असे प्रश्न या दारू छाप्याच्या निमित्ताने निर्माण झाले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डोंबिवली विभागाचे निरीक्षक किरणसिंग पाटील यांना मुंब्रा कौसा पोलीस ठाण्याच्या बाजुला एक दारू विक्रेता वाहनातून दारू विक्रीसाठी घेऊन येणार आहे, अशी गुप्त माहिती मिळाली. निरीक्षक पाटील यांनी ही माहिती तात्काळ विभागाचे ठाणे अधीक्षक डाॅ. नीलेश सांगडे यांना दिली. सांगडे यांनी सापळा लावून दारू विक्रेत्याला पकडण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे निरीक्षक पाटील, त्यांच्या पथकातील दुय्यम निरीक्षक एम. एस. होळ, सागर धिंदसे, पी. ए. महाजन, अमृता नगरकर, प्रीती पाटील, हनुमंत देवकते, शिवराम जाखिरे यांनी दारू विक्रेता येणार त्या मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीत सापळा लावला. प्रत्येक वाहनावर गस्ती पोलिसांनी नजर ठेवली होती. एक चालक व्हॅगनाॅर गाडीतून जामा मशिदीसमोर येऊन थांबला. बराच उशीर तो वाहनात बसून होता. गस्ती पथकाला संशय आला. एका पोलिसाने त्याला हटकले असता आणि वाहनात काय अशी विचारणा करताच चालक घाबरला. त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. गस्ती पथकाने त्याच्या वाहनाला वेढले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केला. त्याच्या वाहनात ६४० लीटर गावठी दारूचे फुगे भरण्यात आले होते. या दारूची बाजारातील किंमत दोन लाख रूपये आहे. या पहिल्या धारेच्या दारूमध्ये किरकोळ विक्रेत्यांकडून पाणी ओतून ती दुप्पट केली जाते. मग त्याची विक्री केली जाते, असे अधिकाऱ्याने सांगितले.
विवेक मदन पाटील (28) असे अटक करण्यात आलेल्या दारू वाहकाचे नाव असून तो कल्याण-शिळ मार्गावरील पडले गावचा राहणारा आहे. त्याला वाहनासह ताब्यात घेण्यात आले. त्याने दारू कुठून आणली ? ती कुठे विक्रीला नेण्यात येणार होती ? याची चौकशी निरीक्षक किरणसिंग पाटील यांनी सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: