
चोरी तीन दुचाकी हस्तगत
– महात्माकेलेल्या फुले पोलीस ठाण्याची कारवाई
दिनेश जाधव : कल्याण
तीन मोटर सायकल चोरी करणाऱ्या एका आरोपीला कल्याण येथील महात्मा फुले पोलीसांनी अटक केली असून त्याच्याकडून 1 लाख 10 हजार रुपयांचा माल हस्तगत केला.
कल्याण परिसरातील खडवली येथे राहणारा माधव भामरे ( 20 ) असे आरोपीचे नाव आहे. सी.सी.टी.व्ही. फुटेज च्या आधारे व गुप्त बातमीदारां कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गोवेली गांव नाका, टिटवाळा येथे सापळा रचुन मध्यरात्रीच्या सुमारास माधव याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी ४०,००० रुपये किमतीची एक सुझुकी कंपनीची अॅक्सेस , ५०,००० रुपये किमतीची एक होंडा कंपनीची अॅक्टीवा, २०,००० रुपये किमतीची एक होंडा कंपनीची पॅशन , अशा एकुण १,१०,०००रु. किमतीच्या एकुण ०३ गुन्हयातील ०३ मोटार सायकल हस्तगत करून गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ सचिन गुंजाळ , सहा. पोलीस आयुक्त, कल्याण विभाग उमेश माने पाटील, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.