
दोन वर्षापासून फरार असलेला गुन्हेगार अखेर पोलिसांच्या ताब्यात
दिनेश जाधव : कल्याण
नार्कोटिक गुन्ह्यात दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोप पकडण्यात बाजारपेठ पोलिसांना अखेर यश आले आहे.
जेठालाल हिमताराम चौधरी हा नर्कोटिकच्या अनीक गुन्ह्यात आरोपी असून गेले काही दिवस बाजारपेठ पोलीस याचा शोध घेत होते. मात्र जन्मतः एका डोळ्याने आधू असलेला आरोपी स्वतःचा बचाव करण्यासाठी काळा गॉगल वापरत असल्याने ओळखणे पोलिसांना कठीण जात होते. दरम्यान पोलीस नाईक सचिन साळवी यांना जेठालाल एपीएमसी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस कर्मचाऱ्यांनी कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरातील गुरुदेव ट्रेडर्स हीम गंगा अपार्टमेंट येथे त्याला बेड्या ठोकल्या.