हरविलेल्या आजीबाईच्या कुटुंबियांचा पाेलिसांनी लावला शाेध कुटुंबियांच्या चेहऱ्यावर झळकला आनंद

हरविलेल्या आजीबाईच्या कुटुंबियांचा पाेलिसांनी लावला शाेध कुटुंबियांच्या चेहऱ्यावर झळकला आनंद

दिनेश जाधव : डोंबिवली

डोंबिवली-24 तासापासून एक वयोवृद्ध आजीबाई एका दुकानासमोर रडत बसली होती. या आजीबाईला तिच्या कुटुंबिताली लोकांची नावे सुद्धा सांगता येत नव्हती. मानपाडा पोलिसांनी 12 तासात या महिलेचे गाव शोधून तिच्या कुटुंबियांचा पत्ता शोधून काढला. या आजीबाईला तिच्या मुलाच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.
डोंबिवली पूर्व परिसरात घरडा सर्कल येथील एका हॉटेलसमोर एक आजीबाई 24 तासापासून बसली होती हॉटेल मालक तिला जेवण देत होता. मात्र ती फक्त रडत होती. तिला केवळ तिचे नाव आणि पती, मुलगा मुलीचे नाव आठवत होते. तिला तिच्या जिल्ह्याचे नाव माहित होते. ती फक्त इतकेच सांगत होती की, माझी मुलगी मला घेण्यासाठी येईल. हॉटेल मालकाच्या लक्षात आले की, ही आजीबाई हरविली आहे. त्याने ही माहिती मानपाडा पोलिसांना दिली. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी त्वरीत पोलिस अधिका:यांना या आजीबाईच्या नातेवाईकांचा पत्ता शोधण्यास सांगितले. पोलिस अधिकारी अविनाश ओनवे, विजय कोळी, राजेंद्र खिल्लारे, मंजा पवार यांनी आजीबाईला विश्वात घेत तिच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या. त्वरीत पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांना संपर्क केला. ज्या समाजाच्या आईबाजी आहे. त्या समाजाचे लोक कोणत्या गावात राहतात. याची माहिती घेतली. त्या गावातील लोकांना संपर्क साधून आजीबाईच्या मुलांचा नंबर सोधून काढला. तिचा मुलगा संतोष पवार हा त्याच्या आईचा शोध घेत होता. संतोष पवार यांना मानपाडा पोलिस ठाण्यात बोलावून त्याच्या आईला त्याच्या स्वाधीन केले. आजीबाई ही रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मुरडव गावात राहते. तिची मुलगी नवी मुंबईतील कळबोळी येथे राहते. आजीबाईने रत्नागिरीहून कळंबोळीला येण्यासाठी बस पकडली. बस चालकाने तिला कळंबोळी ऐवजी डोंबिवली ऐकून तिला डोंबिवलीत उतरविले. यामुळेच हा घोळ झाला. पोलिसानी अथक प्रयत्न करुन आजीबाईला तिच्या घरांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: