
येमेनमध्ये हाइजैक् केलेल्या जहाजावरुन कल्याणच्या तरुणाची सुटका
तरुण सहीसलामत घरी परतला
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण-मध्य आशियाई देशातील येमेन येथील हौसी बंडखोरानी एक मालवाहू जहाज ˈहाइजैक् होते. या जहाजावर नोकरीस असलेल्या तरुणाची साडे तीन महिन्यानंतर सुटका झाली आहे. सुटका झालेला तरुण सही सलामत कल्याणच्या घरी पोहचला आहे. रमजान महिन्यात हा तरुण घरी परतल्याने त्याच्या कुटुंबियांचा जीव भांडय़ात पडला असून त्याच्या परतण्याने आनंदाचा पारावर न उरलेल्या त्याच्या घरी रमजान ईदच साजरी झाली आहे.
कल्याणच्या गोविंदवाडी परिसरात राहणारा मोहम्मद मुन्नवर हा आखाती देशातील खालीद फरज या शिपींग कंपनीच्या मालवाहू जहाजावर डॅक केडर पदावर कार्यरत होता. येमेनचे सौदी आणि संयुक्त अमिरात यांच्यासोबत संघर्ष आहे. या संघर्षात हौसी यांनी खालीद फरज या शिपींग कंपनीचे मालवाहू जहाज ˈहाइजैक्. या जहाजावर मुन्नवर कार्यरत असल्याने त्याची आई बेनजीर आणि बहिण अलीजा यांची चिंता वाढली होती. मुन्नवरचे काय होणार या चिंतेने त्यांना दिवसरात्र झोप नव्हती. मात्र भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्यावर ˈहाइजैक् करण्यात आलेल्या जहाजावरील मुन्नवरच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु झाले. मुन्नवर हा जहाजावरुन सूटन कल्याणच्या घरी सुखरुप परता आहे. मुन्नवर याच्यासह त्याच्या आईने मोदी सरकारचे आभार मानले आहेत.