
कोलशेवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा डाव फसला
एटीएम फोडून चोरीच्या प्रयत्नात असणारा नेपाळी चोरटा गजाआड
दिनेश जाधव : कल्याण
एटीएम मशीन तोडून मशीन मधील पैसे चोरण्याचा प्रयत्न कोळशेवाडी पोलिसांनी उधळून लावला आहे. एटीएम मशीन तोडून पैसे चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोरट्याला कोलशेवाडी पोलीसानी अटक केली आहे. कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरात काल मध्यरात्री च्या सुमारास एक्सिस बँकेच्या एटीम मध्ये एक इसम संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे कोलशेवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत एटीएम फोडून पैसे चोरणाऱ्या या चोरट्याला रंगेहाथ अटक केली. हरकबहाद्दूर बुढ्ढा असा या चोरट्याचे नाव असून हा नेपाळ येथे राहणार आहे काही दिवसांपूर्वी तो कल्याण मध्ये आला होता. त्याने एटीएम मशीन तोडली होती पैसे काढन्याच्या तयारीत असताना कोळसेवाडी पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.