
खासदार डॉक्टर श्रिकांत शिंदे यांनी सावरकरांच्या देशभक्तीला सलाम केला
50 वर्षांची शिक्षा झाली, 11 वर्षे या अंधारकोठडीत सावरकर राहिले
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण– केंद्र सरकारच्या संरक्षण समितीने अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेलला भेट दिली ज्यामध्ये देशाचे महान क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांना ठेवण्यात आले होते. या दौऱ्यात संरक्षण समिती सोबत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे उपस्थित होते. सावरकरांना पोर्ट ब्लेअर सेल्युलर जेलच्या एका विशेष कक्षात ठेवण्यात आले होते, जेथे ब्रिटीशांनी फटके मारून विशेष छळ केला होता. खासदार व संरक्षण समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सेल्युलर जेलच्या त्या कोठडीत जाऊन थोर क्रांतिकारक व स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांना आदरांजली वाहिली व त्यांच्या शूर देशभक्तीला व बलिदानाच्या शौर्याला सलाम केला. महान क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक, इतिहासकार, भारताचे देशभक्त वीर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर गावात 28 मे 1833 रोजी झाला होता. ते लहानपणापासूनच क्रांतिकारी विचारांचे होते. इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. दरम्यान, ब्रिटिश काळात त्यांना 50 वर्षांची शिक्षा झाली आणि ब्रिटिशांनी त्यांना पोर्ट ब्लेअरमधील सेल्युलर जेलमध्ये ठेवले. सावरकर 11 वर्षे तुरुंगात राहिले आणि नंतर 26 फेब्रुवारी 1966 रोजी वयाच्या 82 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.