आंबेडकर जयंतीच्या दिवशी भर रॅलीत सफाई कर्मचाऱ्यावर चाकूचे वार

आंबेडकर जयंतीच्या दिवशी भर रॅलीत सफाई कर्मचाऱ्यावर चाकूचे वार

– चाकू वार करणारा मुख्य आरोपी अटकेत

दिनेश जाधव : डोंबिवली

डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर हॉस्पिटल परिसर येथून घरी जात असताना वंचित बहुजन आघाडी च्या एका युवा कार्यकर्त्यावर चाकूचा हल्ला झाल्याची घटना आंबेडकर जयंतीच्या रात्री घडली. दरम्यान आधीच्या वादातून हा चाकू हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्याला विष्णू नगर पोलिसांनी अटक केली आहे.

डोंबिवली पूर्व येथे राहणारा रोहित भोसले (२० ) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर घरफोडीचे गुन्हे देखील दाखल आहेत. कोपर क्रॉस रोड येथील तेलकास वाडी येथे राहणारा अक्षय दशरथ वाटोळे (24) शास्त्री नगर रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. होळीच्या दिवशी झालेली भांडणे सोडवण्यासाठी अक्षय मध्ये पडला होता. या घटनेचा राग मनात ठेवून आंबेडकर जयंतीच्या दिवशी रात्री निघालेल्या रॅली मध्ये सहभागी झालेल्या अक्षयवर रोहित भोसले याने चाकूने वार केले. सुदैवाने या घटनेत अक्षय वाचला असून सध्या तो शास्त्री नगर रुग्णालयात उपचार घेत आहे. तर रोहित याला पोलिसांनी पकडताच त्याने छातीत दुखत असल्याचा बहाणा केला. त्यामुळे त्याला विष्णू नगर पोलिसांनी कळवा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले आहे. अधिक तपास गुन्हे शाखेचे उप पोलीस निरीक्षक गणेश वडणे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: