
महिला सोनसाखळी चोर अटकेत, ठाणे युनिट दोन गुन्हे शाखेच्या लोहमार्ग पोलिसांची कारवाई
दिनेश जाधव : कल्याण
लोकलमध्ये महिलांच्या डब्यामध्ये मंगळसूत्र /सोनसाखळी लंपास करणाऱ्या महिलेला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
दीपाली सुगंधचंद डींगा या 44 वर्षाच्या महिलेला लोहमार्ग पोलिसांनी भांडुप मधून अटक करून तिच्याकडून तीस हजार रुपये किमतीची सोन्याच्या मण्यांची माळ व 1 साडेसात ग्राम वजनाची सोन्याची चैन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, या महिलांनी चोरीची कबुली दिली असून टिटवाळा मधील दीपा राजन पावस्कर नावाच्या महिलेची सोन्याची माळ चोरल्याच्या गुन्ह्याच्या तपासातून लोहमार्ग पोलीस आयुक्त मुंबई कैसर खालिद, यांच्या आदेशाने लोहमार्ग पोलीस उपायुक्त मनोज पाटील, मध्य परिमंडळ, सचिन कदम सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे लोहमार्ग मुंबई यांच्या मार्गदर्शना व सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशूद्दीन शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक होळकर, पोलीस हवालदार गजानन शेडगे, संदीप गायकवाड अतुल साळवी, अतुल धांडे महिला पोलीस हवालदार वैशाली मयेकर, स्मिता वसावे, यांनी सोनसाखळी चोर आरोपी दीपाली सुगंधचंद डींगा हिला अटक केली आहे.