
पार्लर व्यवसाय करणाऱ्या महिलेचा खून, उधारीवर दिलेले 1 एक लाख रुपये मागण्यास गेलेल्या महिलेचा खून
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण पूर्व नक्की नाका शास्त्रीनगर टेकडी जवळील एका महिलेचा निर्घृण खून करण्यात आला, महिलाही रंजना राजेश जयस्वाल (45) पार्लर व्यवसाय करत असून तिचा मित्र अजय आनंद राजभर याला तिने एक लाख रुपये उधारीवर दिले होते मात्र ते उधारीचे पैसे परत देत नसल्याने तिने त्याच्या घरी जाऊन विचारणा केली असता अजय घरी नसताना त्याचा भाऊ विजय राजभर आणि त्याची आई लालसा देवी राजभर यांच्यामध्ये जोराची भांडण होऊन विजय राजभर यांनी महिला रंजना राजेश जयस्वाल तिच्या अंगावर असंख्य चाकूचे वार केल्याने कंचना जैस्वाल मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज कोळशेवाडी पोलिसांनी दिला, खुनाच्या घटनेत काही तासातच कोळशेवाडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे असे कोळशेवाडी पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी सांगितले.