
तक्रार नोंदवायची गेलेला फिर्यादीच निघाला बोगस डॉक्टर
दिनेश जाधव : कल्याण
अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील टीसीच्या कार्यालयात पाच जणांची तक्रार करायला गेलेला फिर्यादी डॉक्टरांचे बोगस सर्टिफिकीट घेऊन फिरत असल्याचे लक्षात येताच रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
२ एप्रिल रोजी अंबरनाथ ट्रेन येथील लगेज डब्ब्यात बसलेल्या एका बोगस डॉक्टरांनी त्याच्याच डब्यात बसलेल्या काही जणांची चौकशी केली. यावेळी त्या तरुण मुलांकडे तिकीट नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर या बोगस डॉक्टरांनी थेट अंबरनाथ स्थानकातील टीसी चे कार्यालय गाठून त्या मुलांची तक्रार केली. यावेळी तुम्हाला तिकीट तपासणी करण्याचा काय अधिकार आहे असे टीसी कार्यालयातून विचारले गेले. त्यानंतर या डॉक्टरांनी मी रेल्वे मध्ये मेडिकल ऑफिसर असल्याचे सांगितले. मात्र बोलताना तो गांगरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनतर चौकशी केली असता त्यांच्याकडे डॉकटर असल्याचे बोगस सर्टफिकिट आढळून आले. तसेच मेडिकल मध्ये वापरण्यात येणारी काही उपकरणे सापडली. ही उपकरणे जप्त केली असून अधिक तपास रेल्वे पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने करत आहेत.