जुन्या वादातून केले मित्रावर वार, कोळसे वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

जुन्या वादातून केले मित्रावर वार, कोळसे वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

दिनेश जाधव : कल्याण

जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका रिक्षाचालकावर तलवार आणि कोयत्याने वर करण्यात आले आहेत. हा रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बाबू सोनावणे आणि अर्जुन सोनावणे अशी मारहाण करणाऱ्या दोन इसमंची नावे आहेत. चिकणीपाडा तिसगाव रोड येथे राहणारे २५ वर्षीय रामाराव तामाड हे रिक्षाचालक आहेत. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तिसगाव शाखा येथील रिक्षा स्टँडवर ते उभे असताना तामाड यांच्या पाठीमागून येऊन बाबू सोनावणे यांनी तलवारीने तामाड यांच्या डोक्यात वार केले. त्यानंतर त्यांचा पाठलाग करून त्यांना रस्त्यावर खाली पडून पुन्हा अर्जुन सोनावणे यांनी हातावर कोयत्याने वार केले. सध्या तामाड यांच्यावर जे.जे रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: