
ICAI मध्ये तक्रारीनंतर प्रसिद्ध सीए धनकानी यांची पात्रता रद्द होण्याची शक्यता, अटकेची टांगती तलवारही
फर्मच्या भागीदारांसह फसवणुकीचे प्रकरण
लोणावळा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे
कल्याण : सरकार दरबारी चुकीची कागदपत्र सादर करून फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी उल्हासनगरचे प्रसिद्ध सीए विनोद धनकाणी यांची पोलिस ठाण्यात तसेच आयसीएआयमध्ये तक्रार झाल्यानंतर त्यांची पात्रता रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान
एका फर्मच्या भागीदारांसोबत देखील फसवणूक आणि कट रचल्याप्रकरणीही अटकेची टांगती तलवार धनवाणी यांच्यावर आहे.
सीए विनोद धनकानी यांनी मनोहर केसवानी आणि राजकुमार यांची बेकायदेशीरपणे बाजू घेत पक्षपाती भूमिका बजावली असल्याचे सांगितले जाते. केसवानी आणि इतर भागीदारांविरुद्ध सीए विनोद धनकानी यांनी मनोहर केसवानी, राजकुमार केसवानी आणि इतरांना सरकारी रेकॉर्डमध्ये बहुसंख्य भागधारक बनवून कंपनीची अनेक कागदपत्रे खोटी करून बेकायदेशीररीत्या व्यवहार करून नफा मिळवला आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अवलंबलेली नाही. त्यामुळे अशोक केसवानी व किशोर केसवानी या बंधूंचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांचा हिस्सा मनोहर केसवानी, राजकुमार केसवानी आदींच्या नावे बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आला आहे. ज्यामध्ये सीए विनोद धनकानी यांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. वरील कागदपत्रांच्या आधारे किशोर केसवानी यांनी सीए विनोद धनकानी व इतरांविरुद्ध लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, अशोक केसवानी यांचा मुलगा दीपक केसवानी यांनी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) कडे तक्रार दाखल करून शिस्तभंगाच्या कारवाईसह सीए विनोद धनकानी यांचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. सदर तक्रारीच्या चौकशीनंतर, ICAI ने तक्रारीची दखल घेत 17 मार्च 2022 रोजी CA विनोद धनकानी यांना नोटीस बजावली आहे, ज्यामुळे धनकानी यांची पात्रता रद्द होण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर फसवणूक आणि गुन्हेगारी कट प्रकरणी अटकेची टांगती तलवारही धनकानींवर आहे. यासंदर्भात धनवानी यांना दुरध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिले नाही.