खाडीत अवैध रेती उपसा करणाऱ्यांचा विरोधात धडक कारवाई

खाडीत अवैध रेती उपसा करणाऱ्यांचा विरोधात धडक कारवाई

– रेती उपश्याचे साहित्य केले जप्त, कल्याण तहसील कार्यालयाची कारवाई

दिनेश जाधव : कल्याण

खाडी परिसरात नेहमीच मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने रेती उपसा होत असल्याचे निदर्शनास येते. असे असले तरी वाळू उपसा होत असल्याचे माहीत असले तरी अधिकारी वर्ग कारवाई करत नसल्याची चर्चा सर्वत्र रंगलेली दिसते. मात्र मंगळवारी दुपारी वाळू उपसा करत असलेल्या रेती माफियांवर तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दुर्गाडी रेतीबंदर , मोठा गाव परिसर या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असून रेतीनुपसा करणाऱ्यांनी कारवाई पथकाने धाड मारतच पाण्यात उड्या मारून पळ काढला आहे.
ही कारवाई रेती उपसा करणाऱ्यांच्या बोटीने पाठलाग करt करण्यात आली असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे. हा पाठलागाचा कारवाईचा थरार पाहून रेती उपसा करणाऱ्यांनी कारवाईस सुरुवात प्रतिकार केला. मात्र कारवाई पथक जुमानत नसल्याचे पाहून रेती उपसा करणा:या कामगारांनी खाडीच्या पाण्यात उडय़ा टाकून पळ काढला आहे. रेती उपश्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
कल्याणमधील दुर्गाडी रेतीबंदर परिसरात ही कारवाई करण्यात आली. तर डोंबिवली येथील मोठा गाव रेतीबंदर परिसर या दोन ठिकाणी ही धडक कारवाई करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी अवैध रेती उपसा सुरु होता. या दोन्ही ठिकाणी रात्रीच्या सुमारास ड्रेजर्स आणि बाजने रेती उपसा केला जात होता. शेकडो ब्रास काढण्यात आलेली रेती रातोरात हलविली जात होती. रेती उपसा करणारे ड्रेजर्स, बाज, बोटी या खाडीच्या पाण्यात मध्यभागी ठेवल्या जात होत्या. त्यामुळे त्या कळून येत नव्हत्या. त्याची माहिती कल्याणच्या तहसीलदारांना मिळताच त्यांनी कारवाई पथकासह धाड टाकली. थेट खाडीत बोटीने पाहणी करीत असताना त्यांना याठिकाणी अवैध रेती उपसा आढळून आला. तहसीलदारांच्या कारवाई पथकाने रेती उपसा करणा:या बोटीच्या दिशेने धाव घेतली. पथक उपसा करणाऱ्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून बोटीवरील कामगारांनी प्रथम प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाचा आक्रमक पावित्र पाहून कामगारांनी खाडीच्या पाण्यात उडय़ा घेत पळ काढला. कारवाई पथकाने सात रेती उपश्याचे पंप, दोन बाज, रेतीची आठ कुंड या पथकाने नष्ट केली आहे. कारवाई दरम्यान जप्त केलेली शेकडो ब्रास रेती पुन्हा खाडीत सोडण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: