सरकारकडून मोबदला मिळवून त्यासाठी महिला तलाठय़ाने मागितले पंधरा हजार

सरकारकडून मोबदला मिळवून त्यासाठी महिला तलाठय़ाने मागितले पंधरा हजार

महिला तलाठय़ाच्या एजंटाल बेडय़ा
तलाठीचा शोध सुरु

दिनेश जाधव : कल्याण

अतिवृष्टी दरम्यान गाळयाचे नुकसान झाले होते. त्याचा मोबदला मिळाला. हा मोबदला मिळवून देण्याच्या बदल्यात तलाठय़ाने पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. तेच पंधरा हजार घेताना ठाणो लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एका खाजगी इसम अनंता कंटे यांना अटक केली आहे. या प्रकरणात तलाठी अमृता बडगुजर यांना सुद्धा आरोपी करण्यात आले आहे.

कल्याण तालुक्यातील कांबा परिसरात अतिवृष्टीमुळे शेतक:यांचे शेतीचे आणि दुकानदारांचे दुकानाचे नुकसान झाले होते. सरकारकडून या ठिकाणी पंचनामे केले होते. कल्याण तहसील कार्यालयाने हे पंचनामे केले होते. ज्या लोकांचे नुकसान झाले होते. त्यांना मोैबदला देण्यात आला होता. कांबा परिसरातील एका व्यक्तीच्या गाळ्य़ाचे नुकसान झाले. या व्यक्तिला पंचनाम्यानंतर मोबदला मिळाला. हा मोबदला मिळवून देण्याच्या बदल्यात कल्याण तहसील कार्यालयातील महिला तलाठीने पंधरा हजार रुपये मागितले होते. या पैशाची तडजोड कांबा येथे राहमारा अनंत कंटे या व्यक्तिने केली होती. कंटे हा कल्याण पश्चिमेतील तलाठी कार्यालयात काम करतो. तो एक खाजगी इसम आहे. तो सरकारी कामात मध्यस्थी करतो. कंटेला आज पंधरा हजार रुपये देणार होता. त्या आधी त्याने ठाणो लाच लुचपत कार्यालयास माहिती दिली होती. ठाणो कार्यालयाचे उपायुक्त पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस निरिक्षक पल्लवी ढोके पाटील यांनी सापळा लावला. तलाठी कार्यालयात पंधरा हजार रुपये घेताना अनंत कंटे याला ताब्यात घेतले. कंटे याने महिला तलाठी अमृता बडगुजर हिच्यासाठी पैसे मागितले असे समोर आले आहे. पोलिसानी कंटेला ताब्यात घेत अमृता बडगुजर यांचा शोधसुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: