रेल्वे पोलीसाच्या धाडसाचे सर्वत्र होते कौतुक

रेल्वे पोलीसाच्या धाडसाचे सर्वत्र होते कौतुक

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा वाचवला जीव

दिनेश जाधव : कल्याण

एका तरुणाने भरधाव एक्सप्रेस समोर उडी मारल्याची घटना आज दुपारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या ऋषिकेश माने या रेल्वे पोलिसाने आपल्या जीवाची पर्वा न करता तत्काळ रेल्वे रुळावर उडी मारून तरुणाला रुळावरून बाजूला केले. दरम्यान ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

कुमार गुरुनाथ पुजारी असे रेल्वे रुळात उडी मारणाऱ्या १८ वर्षीय तरुणाचे नाव असून तो उल्हासनगरच्या प्रेमनगर टेकडी भागात राहणारा आहे. तर तरुणाला वाचवणारा पोलीस कर्मचारी हा बदलापूरचा रहिवासी आहे. आज दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास कुमार पुजारी हा विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येऊन उभा राहिला. यावेळी कल्याणहून कर्जतच्या दिशेने जाणारी एक्सप्रेस भरधाव वेगात येताना पाहून कुमार याने अचानक रेल्वे रुळात उडी मारली आणि एक्सप्रेस समोर उभा राहिला. ही बाब तिथल्या रेल्वे पोलिसांना निदर्शनास येताच रेल्वे पोलिसांनी तातडीने प्रसंगावधान राखून रेल्वे रुळावर उडी घेतली आणि या तरुणाला रुळातून बाजूला केलं. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. दरम्यान, कुमार पुजारी याने कौटुंबिक वादविवादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: