
फटका गँग मधील एका इसमास रेल्वे पोलिसांनी केली अटक
दिनेश जाधव : कल्याण
हातावर फटका मारून मोबाईल चोरणाऱ्या एका इसमास रेल्वे पोलिसांनी पकडले आहे.यावेळी रेवेच्या दरात उभे राहून फोनचा वापर करू नका असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.
कल्याण येथील होम बाब टेकडी, पत्रीपुल या परिसरात राहणाऱ्या अजय अर्जुन कांबळे या 24 वर्षीय इसमाला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. 8: 18 ची लोकल पकडुन प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या हातावर फटका मारून Y – 95 हा मोबाईल खाली पाडला. याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांच्या हे लक्षात येताच त्यांनी त्या इसमाच्या पाठी धाव घेतली. यावेळी त्याने ड्युटी बजावत असणाऱ्या पोलिस केदार यांच्या देखील हाताला चावा घेत दुखापत करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे पोलीस त्याला पकडण्यात यशस्वी झाले असून ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.