
3.50 लाखांच्या रोकडसह बॅग लंपास
दिनेश जाधव : कल्याण
कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात कल्याण पश्चिमेकडील हिऱ्याचा पाडा परिसरात राहणाऱ्या उमेश बाळाराम कारभारी (37) यांनी तक्रार दाखल केली आहे. कारभारी हे व्यवसायाने वाहन चालक आहेत. सोमवारी दुपारी 12.25 च्या सुमारास कारभारी यांच्या गाडीजवळ उभा असलेल्या एका अनोळखी इसमाने तुमचे पैसे गाडीच्या टायरजवळ पडले आहेत, असे सांगितले. कारभारी हे पैसे उचलण्याकरिता गाडी खाली उतरले असता गाडीतील मागचे सिटवर असलेल्या बॅगमधील 3 लाख 50 हजार रुपये रोख व कागदपत्रे असलेली बॅग सदर अनोळखी इसमाने लांबवली. या संदर्भात उमेश कारभारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून भादंवि कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस फरार भामट्याचा शोध घेत आहेत.