आर्मी युनिट मध्ये कार्यरत असणाऱ्या एकास अटक, परदेशी महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार

आर्मी युनिट मध्ये कार्यरत असणाऱ्या एकास अटक, परदेशी महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार

तीन वर्षापासून शोध होता सुरू

दिनेश जाधव : कल्याण

अर्मीच्या केरळ युनिटमध्ये कार्यरत असणाऱ्या एका तरुणाने तीन वर्षापूर्वी भारतात फिरायला आलेल्या परदेशी महिलेचा धवत्या ट्रेनमध्ये कल्याण ते कसारा दरम्यान विनयभंग केला होता. या आरोपीला पकडण्यात कल्याण रेल्वे पोलीस यशस्वी झाले आहेत.
साहिश टी असे आरोपीचे नाव आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी ही परदेशी महिला गोवा – दिली निजामुद्दीन या ट्रेनने प्रवास करत होती. यावेळी रात्री साडे अकराच्या सुमारास कल्याण कसारा दरम्यान साहिश याने त्या महिलेसोबत अश्लील वर्तन केलं. त्यानंतर या महिलेने हा सर्व प्रकार भारतीय दूतावासाला सांगून तक्रार नोंदवली होती. अनेक प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर ही तक्रार कल्याण जीआरपीने दाखल करून घेतली. कोणतीही माहिती नसल्याने महिलेला फोन लावून त्या व्यक्तीचे वर्णन विचारले. त्यानंतर समाज माध्यमाच्या आधार घेत पोलिसांनी साहीश टी यांना शोधले. मात्र साहीश यांना पोलिसांच्या हालचालीची माहिती मिळताच त्यांनी कल्याण न्यायालयात अटकपूर्व जामीन मागितला परंतु न्यायालयाने तो फेटाळल्याने साहीशने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात देखील साहिशचा अटकपूर्व जामीन फेटाळला. याच दरम्यान साहिश कल्याणमध्ये नातेवाईकांकडे लपला असल्याची माहिती मिळाली. कल्याण जीआरपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या पथकाने त्याला अटक केली असून आज त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: