
बंदर पाडा येथील हत्येतील आरोपीस पाच तासातच पकडण्यात पोलिसांना यश
दिनेश जाधव : कल्याण
शहाड- मोहने वरील बंदर पाडा येथील अज्ञात तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शिताफीने आरोपीस पाच तासातच पकडून जेरबंद केले.
गुरुवार दि.24/02 रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान शहाड जवळील बंदरपाडा परिसरात एका तरुणाची हत्या झाली होती, या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू केला असता मोबाईलच्या साह्याने हत्या झालेल्या तरुणाची ओळख पटली त्यानंतर चौकशीअंती आरोपी शाहरुख यासीन शेख (राहणार टिटवाळा, बनेली, आंबेडकर चौक) यास ताब्यात घेऊन अटक केली केली. मयत तरुणाचे आणि आरोपीचे आठ ते दहा दिवसांपूर्वी भांडण झाले होते या भांडणाचा राग मनात ठेवून आरोपीने डोकयावर आणि मानेवर कोयत्याने वार करून हत्या केल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, गुन्ह्याचा तपास अपर आयुक्त, कल्याण. दत्तात्रय कराळे तसेच पोलीस उपायुक्त, परिमंडळ 3 कल्याण. सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या टीमने अवघ्या पाच तासातच आरोपीस बेड्या ठोकल्या.