
गॅस एजन्सीचे काम सोडणाऱ्या एका कर्मचाऱ्यास बेदम मारहाण
– माजी आमदार संजय दत्त विरोधात गुन्हा दाखल
दिनेश जाधव : डोंबिवली
गॅस एजंसी येथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यांनी काम सोडल्यानंतर तो इतर कामगाराना देखील काम सोडा असे भडकवत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे माजी आमदार संजय दत्त यांनी पिसवली येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यास लोखंडी रॉडचा वापर करत बेदम मारहाण केली. दरम्यान याआधी देखील एका गॅस वितरकाने आगाऊ पगार मागितल्याने त्रास देणाऱ्या माजी आमदार संजय दत्त विरोधात तक्रार दाखल केली होती.
दीपक निकाळजे (२७) हा भारत गॅस एजंसी येथे काम करत होता. १५ दिवसांपूर्वी याने ही नोकरी सोडली.
मात्र इतर कामगारांना हा कम सोडण्यासाठी भडकवत असल्याचा आरोप करत माजी आमदार संजय दत्त यांनी त्याला फोन करून तुला घरातून उचलून नेईन; तुला माहित नाही मी कोण आहे अशा प्रकारची धमकी दिली. त्यांनतर तीन जण शुक्रवारी रात्री दीपक याच्या घरात जबरदस्ती शिरले आणि त्यांना लोखंडी रॉडने डोक्यात, पोटात जबर मारहाण केली. या तीन जणांनी आमदार संजय दत्तची आम्ही माणसे असल्याचे सांगितले. यासंदर्भात दीपक यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दखल केला आहे.
अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ , सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे , मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळू वंजारी या गुन्ह्याचा तपास करत आहेत.