काशी एक्स्प्रेस मध्ये ६ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार – आईने प्रसंगावधान राखत गुन्हेगाराला दिले पोलिसांच्या ताब्यात

काशी एक्स्प्रेस मध्ये ६ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार – आईने प्रसंगावधान राखत गुन्हेगाराला दिले पोलिसांच्या ताब्यात

दिनेश जाधव : कल्याण

आपल्या कुटुंबियांसमवेत काशी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या ६ वर्षाची चिमुरडी आणि प्रवासी झोपेत असल्याची संधी साधली. मात्र याचवेळी प्रसंगावधान राखत चिमुरडीच्या आईने सोनू अशोक प्रजापती (२५) या नराधमाला पकडून ठेवत कल्याण रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. गुन्हा मध्यप्रदेश मधील इटारसी स्थानक हद्दीत घडल्याने पोलिसांनी या आरोपीला इटारसी पोलिसांच्या हवाली केले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवास सुरक्षित नसल्याचे निदर्शनास आले आहे.
पिडीत बालिका १४ फेब्रुवारी रोजी उत्तरप्रदेश मधून काशी एक्स्प्रेसने बदलापूर मधील आपल्या घरी आई, आजी, दोन भाऊ आणि एका बहिणीसह  निघाली होती. प्रवासात पहाटेच्या सुमारास चारही मुलाना झोपवून बसलेल्या आईचा डोळा लागला. इतक्यात याच डब्यातून प्रवास करणाऱ्या सोनू प्रजापती या नराधमाने झोपलेल्या ६ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला. मुलीच्या ओरडण्याने जागे झालेल्या आईने त्या नराधमाला पकडले. यानंतर जागे झालेल्या इतर प्रवाशांनी देखील त्याला पकडून ठेवत बेदम चोप दिला. पहाटे पासून दुपार पर्यत या चोरट्याला प्रवाशांनी पकडून ठेवले होते. तर त्या माऊलीने आपल्या मुलीवर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती तिच्या बदलापूर येथील घरी असलेल्या वडिलाना दिली. वडिलांनी तातडीने कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गाठत सदर घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी रेल्वे स्थानकात फिल्डिंग लावली. १४ तारखेला निघालेली काशी एक्स्प्रेस मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकात पोचताच रेल्वेच्या ३ अधिकारी आणि २० पोलिसांनी गाडीचा ताबा घेत सोनुला ताब्यात घेतले. मात्र हा गुन्हा मध्यप्रदेश मधील इटारसी रेल्वे पोलिसाच्या हद्दीत घडल्याने पोलिसांनी या चिमुरडीची वैद्यकीय तपासणी करत गुन्हा दाखल करून आरोपीला इटारसी पोलिसाच्या ताब्यात दिले आहे. मात्र या घटने नंतर मेल एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची सुरक्षा ऐरणीवर आली असून रेल्वे आणि शासनाकडून महिलाच्या सुरक्षेची हमी दिली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र महिलाच्या सुरक्षा अद्यापि अधांतरीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: