
देव तारी त्याला कोण मारी – बापाने घेतली मुलासह धावत्या गाडीसमोर उडी, मात्र मुलगा वाचला
दिनेश जाधव : कल्याण
मुंबई कडून पुण्याकडे जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस समोर आपल्या मुलासह उडी मारून वडिलांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात बुधवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला असला तरी सहा वर्षाचा चिमुरडा मात्र सुखरूप बचावला आहे.
प्रमोद आंधळे हे उल्हासनगरच्या शांतिनगर परिसरात राहतात. आपल्या सहा वर्षाचा मुलगा स्वराज सह आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते विठ्ठलवाडी स्थानकात आले. विठ्ठलवाडी स्थानकात ट्रेन येण्याची त्यांनी वाट पहिली आणि मुंबईकडून उन्यकडे जाणारी डेक्कन एक्स्प्रेस येत असल्याचा अंदाज घेऊन लहान मुलासह त्यांनी रेल्वे रुळावर उडी मारून आत्महत्या केली. दुर्घटनेत गाडीची धडक बसल्याने प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला मात्र स्वराज ट्रॅक मधून बाहेर पडल्याने तो या अपघातात आश्चर्यकारकरीत्या बचावला .त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी या म्हणीच प्रत्यय येथे पहावयास मिळाला . या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्वराज ला बाहेर काढले तर प्रमोद यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात धाडण्यात आला आहे . प्रमोद यांनी आत्महत्या का केली याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.