
भररस्त्यात पतीने पत्नीवर केले चाकूने वार
दिनेश जाधव : डोंबिवली
भररस्त्यात पतीने पत्नीवर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना डोंबिवली पूर्व येथील दत्त नगर परिसरात घडली. डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात हल्लेखोर पती विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्त नगर परिसरात राहणारा सोमनाथ देवकर (४२) असे या पतीचे नाव असून तो आपली पत्नी वंदना हिच्यावर चारित्र्यावरून संशय घेत असे. मंगळवारी सकाळी संशय घेत तू घरातील पैसे चोरतेस अस म्हणत पत्नी वंदनाला त्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणी संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला निघालेली वंदना रीक्षेत बसत असतानाच सोमनाथ तेथे आला. त्यानंतर काही कळण्याच्या आतच भर रस्त्यात त्यांनी वंदनावर चाकुचे वार केले. यामध्ये वंदना गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांच्या लग्नाला आठ वर्ष झाली असून पती बेरोजगार असल्याचे समोर आले आहे. अधिक तपास राम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी करत आहेत.