बोगस चेकद्वारे खातेधारकाला लुटणारी टोळी जेरबंद – देशभरातील बँकांमध्ये केली लूट

बोगस चेकद्वारे खातेधारकाला लुटणारी टोळी जेरबंद – देशभरातील बँकांमध्ये केली लूट

दिनेश जाधव : डोंबिवली

भरपूर पैसे असलेल्या खातेदारांची माहिती काढून त्याच्या खाते क्रमांकाचे बोगस चेक तयार करून त्या खात्यातून दुसऱ्या बोगस खात्यात पैसे जमा करून ते पैसे मौज मजेसाठी वापरणाऱ्या एका टोळीच्या हातात मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने देशभरात असे गुन्हे केले असल्याचे समोर आले आहे.
सचिन प्रकाश साळस्कर (29, रा. विरार), उमर फारूक (39, रा. विरार), अनेक अनिल ओतारी (33, रा. विरार), मजहर मोहम्मद हुसेन खान (40, रा. विरार), हरिश्चंद्र काशिनाथ कडव (रा. वांगणी), नितीन दिलीप शेलार (40, रा. वांगणी) आणि अशोक बिहारीराम चौधरी (51, रा. महेश अपार्टमेंट, गोग्रासवाडी, नामदेव पथ, डोंबिवली-पूर्व) अशी या टोळीतील सात जणांची नावे आहेत.
या संदर्भात एचडीएफसीच्या कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या दावडीतील शाखेचे मॅनेजर विशाल रामप्रसाद व्यास (45) यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी भादंवि कलम 467, 468, 469, 420, 511, 34 अन्वये ऑक्टोबर 2021 रोजी गुन्हा दाखल केला होता. या घटनेची चौकशी करताना भावेश नावाचा गृहस्थ बँकांमधील मोठ्या खात्याची माहिती या टोळीस देत. त्यानंतर ही टोळी तेच खाते क्रमांक असलेला बोगस चेक तयार करून त्या ग्राहकाची तंतोतंत जुळणारी सही करत असे. तामिळनाडू,गुजरात, कर्नाटक या राज्यामध्ये देखील अशा प्रकारची चोरी करत असल्याची कबुली या टोळीने दिली आहे. आतापर्यंत या आरोपींनी 50 पेक्षा जास्त बोगस बनविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अप्पर आयुक्त दत्तात्रय कराळे , उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक उपयुक्त जे. डी. मोरे मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे पोलीस ठाण्याचे जमादार सुरेंद्र शिंदे दीपक जगदाळे यांनी या गुन्ह्याची उकल केली.

विशेष म्हणजे वपोनि शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीकृष्ण गोरे, विरार पोलिस ठाण्याचे जमादार सुरेंद्र शिवदे, दिपक जगदाळे यांनी केलेल्या तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, हे आरोपी टीम वर्कने काम करतात. यात खातेधारकांचे बँक डिटेल्स गोळा करणे, त्यावर असणारा बॅलन्स, खातेधारकाच्या सहीचे फोटो, वगैरे माहिती घेत असत. त्यानंतर त्या माहितीच्या आधारे बोगस चेक बनवण्याचे काम करत असत. एक साधा चेक घेऊन त्यावरील खातानंबर खोडून, नवीन खातानंबर प्रिंट केला जाई. जमविलेल्या माहितीच्या आधारे मग त्यावर डुप्लिकेट सही केली जात असे. त्यानंतर हा चेक वापरून अकाऊंट टू अकाऊंट पैसे पाठविले जात असत. पैसे ट्रान्सफर करून घेण्यासाठी देखील डमी अकाऊंटचाच वापर केला जात असे. अशाप्रकारे या सात जणांनी मिळून आतापर्यंत कित्ती कंपन्या, बँका आणि व्यक्तींची अशारितीने फसवणूक केली आहे याचा सपोनि श्रीकृष्ण गोरे अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: