
महात्मा फुले पोलिसांनी उघड केले एकूण २३ गुन्हे
– १५ लाख ३८ हजार रुपयांचा माल केला जप्त
दिनेश जाधव : डोंबिवली
महात्मा फुले पोलिसांनी काही मोटार सायकल चोर आणि दागिने चोरणाऱ्या आरोपींना अटक करून एकूण २४ गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. या सर्व आरोपींकडून एकूण १५ लाख ३८ हजार रुपयाचा माल जप्त केला आहे.
कोनगाव येथे राहणाऱ्या कांताबाई भगवान आठवे कल्याण पश्चिम येथे त्यांच्याकडील 4500 रुपये रोख रक्कम मोबाईल फोनवर 54 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे एकूण एक लाख 40 हजार रुपये किमतीचा आई व त्यांच्या हातातील भाजीपाल्याच्या पिशवीमध्ये त्यांनी ठेवला होता. त्या वेळी अज्ञात चोरट्यांनी हातातील भाजीपाल्याच्या पिशवीला एका बाजूस धारदार वस्तूने कापून पिशवीतील चोरून नेला. संदर्भात महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या गुन्ह्यात डोंबिवलीतील पी एन टी कॉलनी येथे राहणाऱ्या आरती दयानंद पाटील आणि आंबिवली येथे राहणारी शालन उर्फ शालिनी पवार यांना संशय आल्याने अटक केले असता त्यांनी कल्याण येथील शिवाजी मार्केट मध्ये गुन्हा केल्याचे कबूल केले. यावेळी त्यांनी आणखी आठ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून आठ लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
रामबाग रोड येथे राहणाऱ्या सिमरन धनावडे यांना योगा क्लास ला जात असताना आदर्श हिंदी हायस्कूल गेट समोरून जात असताना हातातील मोबाईल चोरून पसार झालेल्या आणि चोरांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या आंबिवली येथील इराणी वस्तीतून पकडून आणले आहे. यासाठी महात्मा फुले पोलिसांनी कोंबींग ऑपरेशन आणि पळून जाणाऱ्या चोराचा पाठलाग करत पकडले आहे. यावेळी आरोपी मुस्तफा जाफर यांनी ८ गुन्ह्याची कबुली केली.
काळा तलाव येथून संशयित रित्या पळून जाणाऱ्या तिघांपैकी एका इसमाला अटक केली. यावेळी चौकशी केल्यानंतर मोटार सायकल चोरी केल्याची कबुली आरोपी साजिद अन्सारी यांनी दिली. एकूण चार मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देत त्याचे मित्र समीर हाशमी आणि सालील लुंड यांचा देखील सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.
तर आणखी एक मोटार सायकल चोरीचा पर्दाफाश केला असून उल्हासनगर येथे राहणारा आकाश यशवंते आणि खडेगोळवली येथे राहणारा जॅक बिका यांना अटक केली आहे.
एकूण २३ गुन्ह्याचा उलगडा करत २ महिला आरोपी, ४ पुरुष आरोपी यांना अटक करून त्यांच्याकडून एकूण २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २ मोबाईल फोन, ९ मोटार सायकली व रोख रक्कम १५ लाख ३८ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे उपआयुक्त सचिन गुंजाळ पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, प्रदीप पाटील, दीपक सरोदे, सागर चव्हाण व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.