
कल्याण ग्रामीण मधे हेदुटणेच्या महिलेची फसवणूक
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण : बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या हेदुटणे गावात राहणाऱ्या सुनंदा पंडित पाटील (40) या महिलेच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी 4 अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही महिला गुरुवारी दुपारी 12.20 च्या सुमारास भाजी आणण्यासाठी कोळेगांव येथे जाण्यासाठी मोरया सर्विस सेंटरजवळ रिक्षाची वाट बघत उभी होती. बदलापूरकडून कोळेगांवकडे जाणाऱ्या रोडवर चार इसम हे दोन मोटारसायकलवरून आले व त्यांनी सुनंदा यांना ‘मावशी तू कुठे चालली आहेस’ असे बोलून त्यातील एकाने फिर्यादी यांना काल डोंबिवलीमध्ये एका बाईचा सोन्यासाठी मर्डर झाला आहे. मावशी तुम्ही तुमचे दागिने काढा मी तुम्हाला कागदात बांधून देतो असे सांगुन बाकीच्या 3 इसमांनी बोलण्यात गुंतवून सुनंदा यांच्याकडील 1 लाख 68 हजार 750 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने सदर चार इसमांनी माझी फसवणून करून घेऊन गेले. या प्रकरणी सपोनि ज्ञानोबा सूर्यवंशी अधिक तपास करत आहेत.