प्रजासत्ताक दिनानिमित्त रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त, कल्याणमध्ये डॉग स्कॉडच्या मदतीने शोध मोहीम तीव्र

प्रजासत्ताक दिनानिमित्त रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त, कल्याणमध्ये डॉग स्कॉडच्या मदतीने शोध मोहीम तीव्र

संशयित व्यक्तींवर सुरक्षा दलांची असणार करडी नजर

दिनेश जाधव : कल्याण

कल्याण- प्रजासत्ताक दिनानिमित्त रेल्वे प्रशासनाने स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. याच अनुषंगाने शुक्रवारी आरपीएफकडून कल्याण स्थानकावर शोध मोहीम राबवण्यात आली. त्यात डॉग स्कॉडचीही मदत घेण्यात आली. झडतीदरम्यान संपूर्ण स्टेशन परिसराची कसून झडती घेण्यात आली. यावेळी कल्याण आरपीएफ स्टेशन प्रभारी भूपेंद्र सिंग, उपनिरीक्षक पीपी शेगावकर, एचसी टीआर धाडसे आणि डॉग स्कॉड टीमचे एचसी आरआर जांभे यांच्यासह सर्व सुरक्षा दलाचे कर्मचारी उपस्थित होते. कल्याण आरपीएफचे स्टेशन प्रभारी भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. स्थानक परिसरात विविध ठिकाणी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासोबतच प्रत्येक संशयित व्यक्तीवर बारीक नजर ठेवली जात आहे. मध्य रेल्वेचे कल्याण स्थानक हे खूप मोठे स्थानक आहे. हे स्थानक मुंबईचे मुख्य गेट मानले जाते आणि लाखो प्रवासी येथून जातात. प्रजासत्ताक दिनजवळ आला असून त्यादृष्टीने स्थानकावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आरपीएफचे स्टेशन प्रभारी भूपेंद्र सिंह म्हणाले की, रेल्वे संरक्षण दलाचे कर्मचारी पूर्णपणे सतर्क आहेत आणि आम्ही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: