
पोळी-भाजी चालवणाऱ्या मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून
दिनेश जाधव : डोंबिवली
चोरीच्या उद्देशाने जुन्या मैत्रिणीच्या घरी झोपायला आलेल्या मैत्रिणीनेच त्या ५८ वर्षीय महिलेचा खून केल्याचे उघडकीस आले असून या महिलेचे शेलार नका येथे स्वतःचे पोळी भाजी केंद्र असल्याचे उघड झाले आहे.
पाथरली येथे राहणाऱ्या सीमा खोपडे या ४० वर्षीय महिलेने टिळक चौक येथे राहणाऱ्या विजया बावीस्कर (५८) यांच्याशी दुपारी संवाद साधला. त्यानंतर मी घरी एकटीच आहे तर रात्री तुझ्याकडे झोपायला येते असे विजया यांना सांगितले. त्यावर विजया यांनी होकार दिल्यानंतर रात्री आरोपी सीमा विजया यांच्याकडे झोपायला आली होती. त्याचदरम्यान विजया यांच्या अंगावरचे दागिने चोरून आरोपी सीमाने विजया यांचा गळा दाबला आहे. या प्रकरणाचा शोध अप्पर पोलीस आयुक्त कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चुंबले, बाकले, धोंडे, मुंजाल यांनी या गुन्ह्याचा तपास केला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.