
भरमसाठ आलेली वीज बिल कमी करन्याच्या नावाने नागरिकांची फसवणूक करणारा भामटा गजाआड
दिनेश जाधव : कल्याण
लोकडाऊन च्या काळात महावितरण कडून काही महिन्यांचे बिल घेतल गेलं नाही. लोकडाऊन नंतर महावितरण कडून वीज बिल आकारणी सुरु केली. नागरिकाना भरमसाठ बिल आले होते. एकीकडे लोकडाऊन दुसरीकडे भरमसाठ विज बिल आल्याने नागरिक त्रस्त होते. महावितरणच्या कार्यलयात बिल कमी करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. याच गर्दीत एक तरुण काही लोकांना भेटला, कुणाचे 40 हजार, कुणाचे 50 हजार, कुणाचे 30 हजार अशी बिले आली होती. ही बिले कमी करून देतो महावितरण मध्ये माझी ओळख आहे असे सांगत जवळपास 23 जणांकडून बिल भरन्यासाठी अर्ध्या पेक्षा जास्त रक्कम घेतली. इतकेच नव्हे तर महावितरण मध्ये बिल भर यासाठी स्वतःच्या खात्याचा वापर करत चेक दिला. मात्र हा चेक बाऊंस झाल्याने महावीतरन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा ही बाब समोर आली की या तरुणाने अनेक जणांना बिल कमी करून देण्याचा बहाण्याने पैसे उकळून फसवले होते. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली .सात महिन्यांच्या तपासानंतर 21 साक्षीदारांची चौकशी करत पोलिसांनी साहिल पटेल याला शोधून अटक केली आहे. साहिलने अशा प्रकारे अजून किती जणांना फसवले आहे याचा ही तपास पोलीस करत आहेत.