आधारवाडी जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव -४० कैद्यांसह कर्मचाऱ्यांना झाली कोरोनाची लागण

आधारवाडी जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव -४० कैद्यांसह कर्मचाऱ्यांना झाली कोरोनाची लागण

दिनेश जाधव : कल्याण

ओमायक्रोनचे रुग्ण वाढत असतानाच कल्याण येथील आधारवाडी जेल मधुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये कोरोनाने शिरकाव केला असून जेल मधील ४० कैद्यांसह काही जेल कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
आधारवाडी जेलमध्ये सध्या पंधराशेच्यावर कैदी असून यापैकी ४० कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. या सर्व कैद्यांची तब्येत सध्या ठीक असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. उर्वरित सर्व कैद्यांचे पोषण उत्तमरीत्या व्हावे यासाठी उत्तम आहार देण्यात येत असल्याची माहिती जेल अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली. कारागृहातील सर्वच कैद्यांचे कोवीड लसीकरण पूर्ण झाले आहे. तर कालपासून बूस्टर डोस देण्याचे सुरु असतानाच हा प्रकार समोर आला असून कोवीड रुग्ण सापडल्यानंतर जेलमध्ये सॅनिटायजेशन करण्यात आले आहे.

जेलमध्येही विलगीकरण कक्ष

एखाद्या कैद्याला थंडी – ताप आल्यास जेलमध्ये विलगीकरण कक्षही बनवण्यात आला असून कोरोनाची लक्षणे असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपात याठिकाणी ठेवण्यात येते. तसेच डॉन बोस्को शाळेमध्येही विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून नविन कैद्यांना त्याठिकाणी ठेवले जात असल्याची माहिती जेल अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: