ताडी पिऊन दोन तरुणांचा मृत्यू

ताडी पिऊन दोन तरुणांचा मृत्यू

डोंबिवलीतील घटना, ताडीचे दुकान होते अनधिकृत

दिनेश जाधव : डोंबिवली

अनधिकृत ताडी दुकानातून रात्री ९.३० वाजता ताडी पिऊन निघालेल्या दोन तरुणांना आपला प्राण गमवावा लागला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डोंबिवली पश्चिम येथील कोपर परिसरातील गावदेवी मंदिराजवळ असलेल्या अनधिकृत ताडीच्या दुकानात ट्रॅफिक वॉर्डन असणारा तसेच कोपर येथील रहिवासी असणारा २८ वर्षीय स्वप्नील चोळके आणि कैलास नगर येथील रहिवासी असणारा २२ वर्षांचा सचिन पाडमुख अशा दोन मित्रांनी एकत्र ताडी प्यायचा बेत केला. मात्र रात्री ९.३० च्या सुमारास ताडी पिऊन घरी निघालेले स्वप्नील व सचिन दोघंही रस्त्यातच कोसळले. त्यांनतर या दोघांनाही शास्त्री नगरला नेले असता सचिनचे निधन झाल्याचे सांगितले. तर स्वप्नील याला खाजगी रुग्णालयात दाखल केले असताना त्याचेही निधन झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: