
दगाबाज प्रियकराला अमरावती बडनेरा शहरातुन केली अटक
प्रेयसीवर बलात्कार करणारा प्रियकर दुसऱ्या लग्नाच्या बोहल्यावर चढण्याअगोदरच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दगाबाजाने भूलथापा देऊन प्रेयसीचा केला गर्भपात
दिनेश जाधव : कल्याण
प्रेयसीला प्रेमाच्या आना भाका देत लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. मात्र प्रेयसीला लग्नाचे वचन देणाऱ्या त्या दगाबाज प्रियकराचे दुसऱ्या तरुणीसोबत मंडपात लगीनगाठ बांधण्याच्या तयारीत असतानाच त्याला कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याण कोळसेवाडी भागात असलेल्या शिवाजी कॉलनी परिसरात आरोपी अजय उर्फ विक्की कुटुंबासह राहतो. तो कल्याण रेल्वे यार्डमध्ये नोकरीला असून त्याचे काही महिन्यांपासून कल्याण पूर्वेत राहणाऱ्या मॅरेज इव्हेंट मॅनेजर असलेल्या पीडित तरुणीसोबत प्रेमसंबध निर्माण झाले. त्यांनतर प्रेमाच्या आना भाका देत पीडित प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे प्रेयसी गरोदर राहिल्याने लग्नाचे अमिष दाखवून भूलथापा देत तिचा गर्भपातही केला.
आरोपी अजयने प्रेयसीला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार असल्याची माहिती लपून ठेवली होती. त्यातच अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरात २९ डिसेंबर रोजी आरोपी अजयचा विवाह होणार असल्याची माहिती प्रेयसीला मिळली. तिने तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत दगाबाज अजय विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीचा विवाहसोहळा असलेल्या ठिकाणी धाव घेऊन कोळसेवाडी पोलिसांचे पथक बडनेरा येथे दाखल झाले. त्यावेळी आरोपी अजयच्या विवाहाची तयारी सुरु असतानाच पोलिसांनी पहाटेच्या सुमारास आरोपी अजय याला ताब्यात घेतले.