
अपरात्री दरोडा घालणारे तरुण गजाआड
दिनेश जाधव : डोंबिवली
डोंबिवली – मध्यरात्री रस्त्याने घरी चालत जात असताना चाकूचा धाक दाखवून एका इसमास लुटणाऱ्या सहा जणांच्या चोरट्यांना राम नगर पोलिसांनी अटक केली आहे.
संतोष कुमार झारखंडे शर्मा हे ठाकुर्ली येथील ९० फिट रस्त्यावरून रात्री घरी चालत जात असताना चाकूचा धाक दाखवून लॅपटॉप, मोबाइल, बॅग असा एकूण ४० हजार ४१० रुपयाचा माल चोरी केला. विशेष म्हणजे या चोरी करताना कोणताही पुरावा मागे ठेवला नसल्याने गुन्हेगारांना शोधण्यासाठी कठीण गेले. मात्र २० ते २५ वर्षीय आशु दुमडा, कुणाल बोध, विशाल जेठा, सलमान पुहाल, गणेश लोट हे तरुण डोंबिवली पूर्व येथील त्रिमूर्ती झोपडपट्टी या परीसरात राहणारे आहेत.
सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, समशेर तडवी आणि इतर सहकाऱ्यांनी या गुन्ह्याची उकल केली.