
कौटुंबिक वादातून विवाहितेचा छळ, सात जणांविरोधात गुन्हा दाखल
प्रतिनिधी – उमेश पांढारकर,नंदुरबार
नंदुरबार: शहरातील धुळे बायपास रस्त्याजवळील स्वामी समर्थ अपार्टमेंट येथे कौटुंबिक वादातून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या बागुल यांचा विवाह कुणाल अनिल बागुल यांच्याशी झाला होता.मात्र विवाहानंतर कौटुंबिक वादातून ऐश्वर्या बागुल यांचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. किरकोळ गोष्टींवरुन कुरापत काढून त्यांना मारहाण करण्यात आल्याचे ऐश्वर्या बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.सदरच्या फिर्यादीवरुन संशयित कुणाल अनिल बागुल, अनिल बागुल, पुनम महेश दिलवाले, आरती नितीन बागुल, नितीन बागुल, गिता सुभाष बागुल, महेश मारुती दिलवाले या सात संशयितांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४९८(अ),५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.आर.कंखरे करत आहेत.