
बांधकाम व्यावसायिकाच्या गाडीतून रिव्हॉल्वर आणि गोळ्या चोरी
दिनेश जाधव : कल्याण
डोंबिवली – एका बांधकाम व्यावसायिकाच्या गाडीतून एक रिव्हॉल्व्हर आणि 26 गोळ्या चोरीला गेल्या असून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मानपाडा रोड येथील रॉयल हॉटेल समोर या बांधकाम व्यवसायिकांनी गाडी उभी केली असताना या गाडीतून एक बॅग चोरीला गेली. या बागेत एक रिव्हॉल्व्हर आणि त्यातील २६ गोळ्यांची डब्बी चोरीला गेली असून यामध्ये ॲपल कंपनीचा मोबाईल असा एकूण २७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे. यासंदर्भात मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश डांबरे करत आहेत.