
कल्याणIत भाईच्या कोंबड्यांची टिवटिव
दिनेश जाधव : कल्याण
कल्याणात घडलेल्या एका घटनेमुळे कल्याणात कोंबडी वॉर सुरू झाल्याचं दिसून येतंय. कथित भाई आणि त्याचे हस्तक चिकन सेंटर चालकांना कोंबड्या फक्त भाईच्या दुकानातून घ्या असे धमकावत मारहाण करत आहेत .कल्याण पत्रिपुल परिसरात अशीच एक घटना घडली आहे .एका कोंबडी दुकान चालकाला काही तरुणांनी दुकानात येऊन मारहाण केली. कोंबडी फक्त भाईच्या दुकानात घ्यायची अशी धमकी देत निघून गेले. दुकान चालक अब्दुल अलीम शेख यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिस आत्ता त्या भाई आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेणार का ? हा सवाल उपस्थीत झाला आहे.
आलीम शेख याचे कल्याण पत्रिपुल परिसरात चिकन सेंटर आहे . पहाटे पाच वाजताच्या सुमारास तो त्याच्या दुकानात होता. तेव्हा कोंबडय़ा डिलिव्हरी करणारी गाडी आली होती. कोंबडया उतरविण्याचे काम सुरु असताना एका रिक्षातून चार ते पाच तरुण आले. त्यांनी आधी कोंबडीच्या गाडी चालकाला पिटाळून लावले. नंतर अलीमला मारहाण सुरु केली. मारहाण करणाऱ्या मद्यधुंद तरुणांनी कोंबडीचा धंदा करायचा असेल तर कोंबडय़ा फक्त भाईच्या दुकानातच घे अस दम भरला. कल्याण पूर्व भागातील चक्कीनाका परीसरात असलेल्या एका गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीने कोंबडीचा व्यवसाय सुरु केला हा व्यवसाय सर्वसामान्य दुकानदारांची डोके दुखी ठरत आहे.
या प्रकरणी डोंबिवली टिळकनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे मात्र या कोंबडी भाईला पोलिस आळा घालणार आहेत की याची दहशत वाढतच जाईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.