
अदानी उद्योग समूहाने स्थानिक तरुणाना नोक:या द्याव्यात
शिवसेनेने काढला मोर्चा
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण-मोहने नजीक असलेल्या एनआरसी कंपनीच्या जागेवर अदानी उद्योग समूह भला मोठा लॉजिस्टीक पार्क उभारणार आहे. या प्रकल्पात कामगारांच्या मुलांसह स्थानिक तरुणांना नोकरी देण्यात यावी यासाठी शिवसेनेच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला.
शिवसेनेचे अंकुश जोगदंड, मयूर पाटील आणि दया शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा कंपनी गेटवर काढण्यात आला. यावेळी व्यवस्थापनाच्या विरोधात घोषणाबजी करण्यात आली. कामगारांना थकीत देणी मिळालेली नाही. अनेक कामगारांचा मृत्यू झाला आहे. कामगारांच्या मुलांना नोक:या नाहीत. अदानी उद्योग समूहाने कामगारांच्या मुलांसह स्थानिक तरुणाना नोकरी द्यावी अशी मागणी केली आहे. कंपनीच्या निवासी वसाहतीमध्ये कंपनीची शाळा सुरु आहे. या कंपनीच्या शाळेत कामगारांची मुले शिक्षण घेत आहे. कंपनी बंद असल्याने कामगारांना फी भरता येत नाही. कामगारांच्या मुलांची फी माफ करण्यात यावी ही देखील मागणी यावेळी करण्यात आली.